Viral Video SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! बोटिंग करणाऱ्या व्यक्तीला व्हेल माशाने गिळलं; तरीही तो वाचला, थरारक VIDEO

Viral News: हंपबॅक व्हेलने एका व्यक्तीला काही क्षणांसाठी गिळले, पण त्याला कोणतीही इजा न होता सोडून दिले. हा रोमांचक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Dhanshri Shintre

चिलीच्या पॅटागोनियाजवळ घडलेली एक अद्भुत घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी, मॅगेलनच्या समुद्रामधील सॅन इसिड्रो लाइटहाऊसजवळ एक व्यक्ती आणि त्याचे वडील कायाकिंग करत असताना अचानक एक हंपबॅक व्हेल पाण्यातून वर आली. काही क्षणांतच तिने एका व्यक्तीला गिळले. मात्र काही वेळानंतर कोणतीही हानी न करता त्याला सोडून दिले.

ही रोमांचक आणि भयानक घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने ही घटना सांगतानी तो म्हणाला की त्यानी काही सेकंदांसाठी त्याचा श्वास रोखला होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तो या घटनेतून सुखरूप बचावला. विशेष म्हणजे हे सगळे दृश्य त्याच्या वडिलांनी पाहिले पण घाबरले नाहीत. त्यांनी अतिशय शहाणपणाने परिस्थिती हाताळली.

काही सेकंदांनंतर व्हेलने त्याला सुरक्षित सोडले. त्या व्यक्तीला यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. व्हिडीओमध्ये ते सतत शांत राहा असे सांगताना ऐकू येतात. याचा संपूर्ण प्रसंग त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्यक्ती नशीबवान ठरला की तो या थरारक अनुभवातून सुरक्षित बाहेर आला. अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितले की, मला क्षणभर वाटले की व्हेलने मला गिळले आहे आणि मी मेलो आहे.

त्या व्यक्तीला आपल्या सुरक्षेची चिंता होतीच, पण त्याहून अधिक काळजी वडिलांसाठी वाटत होती. व्हेल त्याला सोडून गेल्यावर वडिलांवर हल्ला करेल की काय, अशी भीती त्यांना सतावत होती. या भयानक घटनेदरम्यानही ते शांत राहिले आणि संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत राहिले. तो व्यक्ती पाण्यातून वर येताच पोहण्यास सुरुवात केली आणि काही वेळाने ते वडिलांच्या कायाकवर पोहोचले आणि अखेरीस किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT