Foreigner Delhi air purifier viral saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

Foreigner Delhi air purifier viral: दिल्लीतील प्रदूषणाची पातळी जगभरात चर्चेचा विषय आहे. याचाच प्रत्यय एका परदेशी नागरिकाला आला. दिल्लीमध्ये राहणाऱ्या या परदेशी व्यक्तीने दोन महिन्यांनी आपला एअर प्युरिफायर साफ केला आणि आत पाहून तो थक्क झाला.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेकांच्या घरात एअर प्युरीफायर असतं. याची नियमितपणे सफाई करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिल्लीतील एका विदेशी व्यक्तीने त्याचं एअर प्युरीफायर फिल्टर साफ करतानाचा व्हिडीओ तयार केलाय.

दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती आता सर्वांना माहिती झालीये. दिल्लीतील अनेक भागात प्रदूषणाचा विळखा इतका जास्त आहे की, बरेच जण आजारी पडलेत. दिल्लीत राहणाऱ्या एका विदेशी व्यक्तीने त्याच्या घरी असलेला एअर प्युरीफायर फिल्टर २ महिन्यांनी साफ केला. यावेळी साफ करताच्या व्हिडीओमध्ये जे काही दिसतंय ते अगदी धक्कादायक आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला व्हिडीओ

एअर प्युरीफायर फिल्टर नावाच्या इन्स्टा हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये ऑसी भाई नावाने प्रसिद्ध असलेला इवांस एका एअर प्युरीफायर फिल्टर काढताना दिसतोय. हा फिल्टर नियमित वापरानंतर पांढरा किंवा हलका चॉकलेटी रंगाचा होतो. मात्र हा इवांस साफ करत असताना तो पूर्णपणे काळा दिसतोय. ज्यावर धुळीचे कण जमा होऊन एक जाड घाण थर निर्माण झाल्याचं दिसतंय.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की दिल्लीमध्ये किती प्रमाणात प्रदूषण निर्माण झालंय. दिल्लीतील प्रदूषणामुळे सरकारी दवाखान्यातही रूग्णांची रांग वाढल्याचं दिसून येतंय.

युझर्सने दिल्या विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स दिल्या आहेत. यामध्ये एकाने, या जाड थराने तु स्वेटर विणू शकतोस असं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने म्हटलंय की, यासाठीच मी माझा प्युरीफायर दर दोन आठवड्यांनी साफ करण्याचा प्रयत्न करतो. लोकं प्रदूषणाच्या बाबतीत बेफिकीर आहेत. येत्या काळात हे प्रदूषण अजून जास्त धोकादायक बनणार आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे, हे लोकांना समजत नाहीये, असंही एका युझरने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT