Auto Rickshaw Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Auto Rickshaw Viral Video: बापाची वेडी माया! लेकीच्या वाढदिवशी फुग्यांनी सजवली संपूर्ण रिक्षा; VIDEO VIRAL

Auto Rickshaw Driver Viral video: बापलेकीचे नाते हे खूप जास्त स्पेशल असते. वडील आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतात. असंच एक रिक्षाचालकाने आपल्या लेकीसाठी केले आहे. त्यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त स्वतः ची रिक्षा सजवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बापलेकीचे नाते हे खूप जास्त स्पेशल असते. वडील आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतात. त्यांचे आपल्या मुलीवर खूप जास्त प्रेम असते. बाप आपल्या मुलीच्या प्रत्येक दिवसाला अजूनच स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात तिच्या वाढदिवशी तिला काही न काही सरप्राईज देत असतो. एक वडिलांनी आपल्या लेकीच्या वाढदिवशी चक्क त्यांची रिक्षाची फुग्यांनी सजवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत (Viral Video Of Auto Rickshaw Driver )एका रिक्षात फुगे लावल्याचे दिसत आहे. रिक्षात फुगे लावण्याचे कारण म्हणजे रिक्षाचालकाच्या मुलीचा वाढदिवस. रिक्षाचालकाच्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुतील एका रिक्षाचालकाने लेकीच्या वाढदिवसासाठी रिक्षा सजवली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Sumedha Uppal या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक महिला रिक्षातून जात असताना तिने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बापलेकीचं प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट. बाप आपल्या लेकीसाठी काहीही करु शकतो, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

SCROLL FOR NEXT