Little Girl Fashion Show Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकलीच्या क्युटनेसचा जलवा! नखरा अन् हटके रॅम्पवॉकपुढे मॉडेलही फेल; व्हिडीओ तुफान व्हायरल

Little Girl Fashion Show Viral Video: एवढ्या कमी वयात या मुलीने आत्मसात केलेली कला पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये चिमुकलीने एखाद्या मॉडेललाही लाजवेल असा केलेला हा रॅम्पवॉक पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

Cute Girl Ramp Walk Viral Video:

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणतात ते खोटं नाही. चिमुकल्यांचा निरागसपणा, त्यांच्या बाललिला नेहमीच सर्वांना भुरळ घालत असतात. कधी कधी लहान मुले मोठ्या माणसांचे इतके हुबेहुब अनुकरण करतात की पाहणाऱ्यांनाही धक्का बसावा. सध्या सोशल मीडीयावर अशाच एका गोड चिमुकलीच्या फॅशनने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) लहान मुला- मुलींचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लहान मुले इंस्टाग्राम, युट्यूबवर प्रसिद्ध आहेत. ज्याचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना भुरळ घालत असतात. मात्र आजपर्यंत फॅशन शोमध्ये भाग घेणारी अन् थेट रॅम्प वॉक करणारी चिमुकली तुम्ही पाहिली नसेल. सध्या अशाच एका चिमुकलीच्या फॅशन शोमधील व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

एवढ्या कमी वयात या मुलीने आत्मसात केलेली कला पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये चिमुकलीने एखाद्या मॉडेललाही लाजवेल असा केलेला हा रॅम्पवॉक पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. मुलीच्या पालकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या गोड अदांचे कौतुक केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर लहान मुलांच्या फॅशन शोचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून इकडे तिकडे सर्वजण फिरताना दिसत आहेत. अशातच एका गोड मुलीची एन्ट्री होते, जिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळतात.

पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली, अतिशय सुंदर दिसणारी ही लहान मुलगी इतका जबरदस्त रॅम्पवॉक करत आहे की तिच्यापुढे एखादी मॉडेलही फिकी पडेल. हा व्हिडिओ माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून आत्तापर्यंत त्याला लाखो व्हिव्यूज मिळाल्या आहेत. ( latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

SCROLL FOR NEXT