Shopkeeper and Customer Fight Video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दोन पाणीपुरी ज्यादा हव्या होत्या, पण दिल्या नाही; विक्रेता आणि तरुणाची झाली जोरदार हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Shopkeeper and Customer Fight Video: पाणीपुरी विक्रेता आणि ग्राहकामध्ये पाणीपुरीवरून वाद झाला. या दोघांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

Vishal Gangurde

Shopkeeper and Customer Fight Video Viral on Social Media

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक तरुण ग्राहक आणि पाणीपुरी विक्रेत्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. केवळ १० रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या हाणामाराची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये पाणीपुरी विक्रेता आणि ग्राहकामध्ये पाणीपुरीवरून वाद झाला. या दोघांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंद करत तरुणाचा शोध सुरू केला आहे. पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करणारा तरुण फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला लवकरात लवकर पकडलं जाईल, असे पोलिसांचं म्हणणं आहे.

पाणीपुरी विक्रेत्याला बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूरमधील अकिल तिराहे येथे पाणीपुरी विक्रेता रामसेवक हा अनेक दिवसांपासून पाणीपुरीचा धंदा लावत आहे. रामसेवक हा १० रुपयांना ५ पुऱ्या विकतो. मात्र, त्याच्याकडे आलेल्या एका ग्राहकाने त्याला १० रुपयांमध्ये ७ पुऱ्या मागितल्या. यावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला.

दोघांचा वाद इतका टोकाला गेला की, तरुणाने पाणीपुरी विक्रेत्याला भररस्त्यात ग्राहकाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाने विक्रेत्याला जोरात लाथा-बुक्क्या हाणल्या. या दोघांची हाणामारी होत असताना कोणीही त्यांची भांडणे सोडवायला पुढे आले नाही.

घटनास्थळी लोकांनी या दोघांच्या हाणामारीचा व्हिडिओ कॅमेरात कैद करण्याशिवाय दुसरं काहीचं केलं नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या घटनेतील पाणीपुरी विक्रेत्याने कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांत नोंद केलेली नाही.

'मी गरीब पाणीपुरी विक्रेता असून मला पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकायचं नाही, असं त्याचं म्हणणं आहे. अशा घटना किरकोळ असल्याचं म्हणणं तेथील स्थानिकांचं आहे.

...म्हणून पाणीपुरी विक्रेत्याने तक्रारच केली नाही

पोलीस अधिकारी दुर्ग विजय सिंह यांनी सांगितले की, पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण झाल्याची घटना माहिती होताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मात्र, तोपर्यंत बेदम मारहाण करणारा तरुण पळाला होता. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून चेहरा हेरून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, पाणीपुरी विक्रेत्याने त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT