Rs 500 note to be Discontinued Saam Tv News
viral-satya-news

ATM मधून निघणार नाही 500ची नोट? ५००ची नोट बंद करण्याची तयारी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Rs 500 note to be Discontinued : ATM मधून आता 500 रुपयांची नोट निघणार नाही...ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...पण होय, आता एटीएममधून 500 ची नोट निघणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय...

Prashant Patil

संदीप चव्हाण, साम टिव्ही

एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा येणं का बंद झालंय...? खरंच फक्त आता एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच येणार आहेत का...? या व्हायरल मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...कारण, पैशांचा विषय हा सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे...त्यामुळे याची सत्यता सांगणं गरजेचं आहे...आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

देशात 73% एटीएममध्ये 100-200 रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत. आरबीआयनं 100-200 च्या नोटांची संख्या वाढवलीय. एटीएममधून 500 च्या नोटा निघणार नाहीत. 500 ची नोट बंद करण्याची तयारी सुरू. हा दावा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे...त्यामुळे याची इत्यंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट एटीएममध्ये पोहोचले...आणि खरंच आता एटीएममधून 500 च्या नोटा येणं बंद झालंय का...? हे जाणून घेतलं...

व्हायरल सत्य, साम इन्व्हिस्टिगेशन

ATMमधून 100-200 आणि 500च्या नोटा निघतात

500 रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार नाही

75% ATMमध्ये लहान चलन असणे आवश्यक

500 रुपयांची नोट बंद होणार हा दावा खोटा

असे मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय...कोणतंही चलन बंद करण्याआधी किंवा कोणतेही नियम बदलले तर आरबीआय प्रेसनोट काढून माहिती देते...मात्र, एटीएममधून फक्त 100-200 रुपयांचीच नोट येणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT