Mansukh HIren - Sachin Waze
Mansukh HIren - Sachin Waze 
viral-satya-news

मनसुख हिरेनच्या तोंडात सचिन वाझेनेच रुमाल कोंबले

सूरज सावंत

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरणातील Antilia Bomb Case संशयित मनसुख हिरेन यांची  हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोडांत ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नसून सचिन वाझेनेच कोंबल्याचं सांगितलं जात आहे. Sachin Waze Inserted Handkerchiefs in Mansukh Hiren Mouth 

सचिन वाझे Sachin Waze सध्या न्यायालयीन कोठडीत असून अँटिलिया बाँब प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरु आहे. एनआयएच्या NIA सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिरन Mansukh Hiren यांच्या हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने  ठाण्याला आला होता.

त्यावेळी कळवा Kalva स्थानकावर त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. एनआयए च्या तपासात कळवा स्थानक परिसरातले सीसीटिव्ही तपासले असता, वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे. Sachin Waze Inserted Handkerchiefs in Mansukh Hiren Mouth 

सीसीटिव्ही CCTV अस्पष्ट असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंगही वाझेसारखीच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं अटक केलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी एनआयएनं काल छापेमारी केली.या वेळी एनआयएनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्र आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT