संदीप चव्हाण (साम टीव्ही)
Prayagraj Statue Fact Check : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शिवरायांचा पुतळा बसवलाय असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. सम्राट हर्षवर्धन यांच्या पुतळ्यावरून आधीच राडा झाला होता. त्यामुळे पुन्हा हा पुतळा हटवून तिथे शिवरायांचा पुतळा बसवलाय का? या दाव्यात किती तथ्य आहे? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. ज्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा होता त्याच ठिकाणी सरकारने खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय का हे जाणून घेऊया. २१ सेकंदाच्या या व्हिडिओत १० सेकंदावर दोन ब्रीजच्या मध्येच शिवरायांची मूर्ती असल्याचं दिसते. या व्हिडिओतील फ्रेम आम्ही रिवर्स सर्च केली. त्यावेळी सोशल मीडियावर हा व्हिडिओ २० डिसेंबर २०१४ रोजी अपलोड केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
व्हायरल सत्य
- व्हायरल व्हिडिओ प्रयागराजच्या कुंभमेळ्यातला नाही
- सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा सीएमपी तिराहा इथे आहे
- योगी सरकारने पुतळा एक किमी दूर हलवून पुन्हा बसवला
- शिवरायांचा पुतळा संभाजीनगरच्या क्रांती चौकातील
सम्राट हर्षवर्धन कोण होते यावरही नजर टाकूयात.
हर्षवर्धन यांनी जवळजवळ ४१ वर्षे राज्य केले...या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपूरपर्यंत केला...असं म्हणतात, इसवी सन ५९०-६४७ या काळात हर्षवर्धन हे कुंभमेळ्यात प्रयागराजला यायचे...त्यावेळी ते कुंभमेळ्यात दानधर्म करायचे. त्यामुळे त्यांचा पुतळा प्रयागराजमध्ये बांधलाय. मात्र, सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शिवरायांचा पुतळा बसवल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.