zp election in maharashtra 2026  Saam TV marathi news
Video

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, कोर्टातून आली मोठी अपडेट

Zilla Parishad elections likely to be postponed in Maharashtra : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सर्व ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली असून यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra local body elections legal update : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत १२ झेडपीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात याव्यात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT