Yashomati Thakur addressing the media after receiving Diwali groceries from Ravi Rana, Amravati. Saam Tv
Video

ये भैय्या अन् भाभी, औकातीत राहायचं; दिवाळीचा फराळ पाहून यशोमती ठाकूर संतापल्या, नेमका काय आहे प्रकार|VIDEO

Yashomati Thakur Angry Over Diwali: आमदार रवी राणांनी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने किराणा पाठवल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

अमरावती: आमदार रवी राणांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने किराणा पाठवल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. यशोमती ठाकूर म्हणाल्या, "भैया आणि भाभी अवकातीत राहायचं. मी पराभूत झालेली नाही. मी जिंकली, मला काही फरक पडत नाही. मी पक्ष बदलत नाही, सरड्यासारखे रंग बदलत नाही. तुम्ही तुमच्या अवकातीत राहा. पुन्हा कधी अशी भानगड केली, तर तुम्हाला असे उत्तर मिळेल की ते तुम्ही कायम लक्षात ठेवाल. मागील दहा वर्षांत काही विचित्र लोक अमरावतीच्या नावावर छाया टाकत आहेत. "हलकटपणाची वागणूक, पक्षांतर करणे, आमच्या समर्थनाने राजकारण करणे, भाजपच्या समर्थनाने राजकारण करणे हे सगळं आम्हाला नको. ते म्हणाल्या, "शाळांमध्ये जे तेल वाटलं जातं, त्याचं प्रतीक या किराण्याच्या थैलीत होतं. आमच्या घराच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही असे धंदे करत नाही. जर असे चिल्लर धंदे चालू राहिले, तर त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊ. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे आणि हरामखोर लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT