Woman seen dancing and arguing with a passenger inside a Mumbai local train in a viral video. Saam Tv
Video

मुंबई लोकलमध्ये महिलेचा अश्लील डान्स, पुरुषाला ही मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Woman Obscene Dance Assault Viral Video: मुंबई लोकलमध्ये महिलेने अश्लील डान्स करत पुरुषाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये गेल्या काही दिवसांत विविध घटना समोर येत आहेत. कधी दरवाज्यावर उभे राहून स्टंट करणे, तर कधी जागेच्या कारणावरून प्रवाशांमध्ये हाणामारी अशा घटना जवळपास रोजच घडत आहेत. मात्र आता या सगळ्याला अश्लीलतेचीही जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. मुंबई लोकलमध्ये एका महिलेनं पुरुषांच्या डब्यात घुसून अश्लील डान्स करत काही पुरुषांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढ्यावरच न थांबता, संबंधित महिलेनं वांद्रे रेल्वे स्थानकावरही डान्स केल्याचं समोर आलं आहे. यावेळी तिने तेथे उभ्या असलेल्या एका पुरुषाला मारहाण केल्याचाही आरोप आहे. व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये काळा टॉप आणि ग्रे जीन्स परिधान केलेली महिला एका पुरुषाशी वाद घालताना दिसते. संबंधित पुरुष फोनवर बोलत असल्याचंही व्हिडिओत दिसतं. महिलेने त्या पुरुषावर तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्याला मारहाण केल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT