CM Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam Tv
Video

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार, उपमुख्यमंत्री सत्तेतून बाहेर पडणार? खासदाराच्या दाव्याने उडाली खळबळ

Maharashtra political earthquake : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता सोडून महाविकास आघाडीत येतील असा मोठा दावा केला आहे.

Namdeo Kumbhar

NCP Sharad Pawar Ajit Pawar reunion : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरून केलेल्या वक्तव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार सत्ता सोडून मविआसोबत येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची मने जुळली आहेत, त्यानंतर महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढत आहेत. याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी अजित पवार मविआसोबत येतील, असा दावा केला.

अजित पवारांवरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्यानंतर खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी जोरदार पलटवार करत, संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन लागलं असल्याची टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT