Who is Deven Bharti : देवेन भारती कोण आहेत? saam tv
Video

Who is Deven Bharti : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती कोण आहेत?

mumbai police commissioner deven bharti : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी अनेक हायप्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे.

Nandkumar Joshi

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. विवेक फणसाळकर हे आज, ३० एप्रिलला निवृत्त झाले. त्यानंतर देवेन भारती यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांनी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदावर काम केले आहे. हे पद नव्यानेच निर्माण केले होते आण त्या पदावर भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती.

देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एप्रिल २०१५ मध्ये भारती यांची मुंबईच्या सह पोलीस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर त्यांनी सर्वाधिक काळ काम केलं. देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. त्यात मुंबईवरील २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला, जे. डे. हत्याकांड यांसारख्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात देवेन भारती यांचा मोठा वाटा होता, असं बोललं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT