Gautami Patil performing in Hingoli amid heavy rainfall and political controversy Saam Tv
Video

ये मेरा दिल प्यार का दिवाना... अतिवृष्टीमुळे बळीराजा टाहो फोडत असताना शिंदेसेनेनं भरवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम, VIDEO

Gautami Patil Dance Event During Heavy Rains: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक संकटात असताना हिंगोलीत गौतमी पाटील यांचा नृत्य कार्यक्रम पार पडल्यानं राजकीय असंवेदनशीलता समोर आली.

Omkar Sonawane

राज्यभरामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांवर महाभयंकर संकट पावसामुळे ओढवले आहे, कुणाच्या घरातील जनावरे गेली तर कुणाच्या शेतातील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली घरातील करती माणसं देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली, महाराष्ट्रावर आलेल्या या संकटामुळे अख्खा देश हळहळला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकारण्यांना याचं भान आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. आणि त्याला कारण ठरले आहे हिंगोलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी राम कदम यांच्या कुलस्वामिनी नवदुर्गा उत्सव समितीने गौतमी पाटील यांच्या डान्सचे केलेले आयोजन, काल रात्री लावणी सम्राटनी असलेली गौतमी पाटील हिंगोलीमध्ये दाखल झाली आणि गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना चक्क लाठीचार करावा लागला इतक्या संख्येत तरुण या कार्यक्रमासाठी आले होते.

धक्कादायक म्हणजे भर पावसात देखील गौतमी पाटीलला नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता पुढे आलेली दिसली, विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्याच्या नुकसान पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेले शिंदेशानेचे मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सेनगाव शहरात पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भुसे यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. तर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी संतोष बांगर यांनी देखील या कार्यक्रमाला अनुपस्थिती लावली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले राम कदम यांनी हा कार्यक्रम भर पावसामध्ये घेतला त्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आम्ही कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राम कदम यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला. मात्र, या सगळ्या कार्यक्रमावर त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT