india vs pakistan tension : पाकिस्तानी तरूणाचा व्हिडिओ व्हायरल Saam tv
Video

India Vs Pakistan : मोदींना मित्र बनवा, पाकिस्तान वाचवा; पाकिस्तानी तरूणाचा व्हिडिओ व्हायरल

India vs Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्ताननं भारतातील काही भागांत हल्ले केल्यानंतर तिथली जनता संतापली आहे. पाकिस्तानला वाचवायचं असेल तर, मोदींना मित्र बनवा, असं पाकिस्तानी तरूण म्हणू लागलेत.

Nandkumar Joshi

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला. दहशतवादाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली. दहशतवाद मुळापासून नष्ट करण्याचा चंगच बांधला. ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. त्याअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. नऊ ठिकाणांवर लक्ष्यभेद केला. पण दहशतवादी आणि दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान बिथरला. त्यांनी भारतावरच हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिला जात आहे.

सध्या या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचं हे वागणं तिथल्या नागरिकांनाही खटकत आहे. पाकिस्तानच्या सरकारविरोधातच तेथील जनता आता उघडपणे संताप व्यक्त करत आहे. एका पाकिस्तानी तरूणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यात त्यानं पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकिस्तानला वाचवायचं असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्री करा. भारताच्या तुलनेत पाकिस्तान शून्य आहे, असेही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT