Vikas Mahatme News: एकीकडे आरक्षणाचा विषयाला धरून राजकीय वातावरण ढवळून निघालं. यातच सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षणा अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. याने आरक्षणाचा प्रश्न सुटणे कठीण असल्यानं यावर भरीत सुचिकरण प्रणाली हा पर्याय ठरू शकतो असं माजी राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे म्हणालेत. जस्टीस रोहिणी कमिशनने मांडल आहे की, आरक्षणाची टक्केवारी निश्चित असली तरी त्या प्रवर्गातील मोजक्याच जातींना त्याचा लाभ मिळतो. त्याच प्रवर्गातील काही जाती आरक्षण असताना लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे डॉ. महात्मे यांनी अभ्यासलेल्या भारित सुचिकरण प्रणालीनुसार यात शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आरक्षण दिल्यास हा वाद सोडवला जाऊ शकतो असा दावा माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.