Vijay Wadettiwar SAAM TV
Video

Vijay Wadettiwar: प्रभूश्री रामाने पुन्हा जन्म घ्यावा आणि या रावणासारख्या नालायक,नतभ्रष्ट सरकारला नष्ट करावे - विजय वडेट्टीवार, VIDEO

This Government Is Like Ravana: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

Omkar Sonawane

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. प्रभूश्रीरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. या अमर्याद सरकारला वेसण घालण्यासाठी प्रभू रामाने पुन्हा जन्म घ्यावा आणि अशा नालायक नतभ्रष्ट देश डुबवणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी जे गर्वाने फुललेले सरकार आहे, रावणासारखे गर्व असणारे हे सरकार नष्ट करण्यासाठी रामाने जन्म घ्यावा अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानावर त्यांनी हे सरकार भावना शून्य असल्याचे सांगत जोरदार निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, कृषिमंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी बांदावर जाऊन त्यांना आश्वस्त करण्याची गरज आहे. पण या सरकारला संवेदना राहिल्या नाहीये. यांना सत्तेची मस्ती आली आहे म्हणून यांची भाषा ही बदलली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले काय आणि शेतकरी मेला काय या सरकारला काही देणे घेणे नाहीये अशी टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT