Nashik Simhastha Kumbh Mela  AI Image
Video

Nashik : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात! राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य धर्मध्वजारोहण सोहळा

Nashik Sihansth Kumbhmela News : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभासाठी आज भव्य धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंड येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे.

Alisha Khedekar

Nashik Simhastha Kumbhmela Today Update नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज भव्य धर्मध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज फडकवण्यात येणार असून, याच क्षणापासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रामकुंड परिसर सज्ज झाला आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, भव्य मंडप, धार्मिक प्रतीके आणि ऐतिहासिक देखाव्यांच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा आध्यात्मिक वारसा अधोरेखित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, आठ मंत्री यांच्यासह अनेक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशाच्या विविध भागांतून साधू-महंत आणि धर्मगुरूही या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा रामकुंड परिसराला भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. त्यामुळे आजच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदे गटाच्या आमदाराला भाजपचा खणखणीत इशारा

Mumbai Fort : स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान! एकाच डोंगररांगेवर वसलंय दोन किल्ले, मुंबईजवळच आहे खास लोकेशन

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला मिळाला नवा कॅप्टन; कोण असेल निशाण्यावर? सदस्यांची उडणार झोप

MLC Election Result : नागपूर पदवीधरमध्ये भाजपचा गेम? '2' क्रमांकाचा कोहळेंना फटका, भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह

Cycling Benefits: लहानपणीचा खेळ होईल वजन कमी करण्याचं निमित्त, जीममध्ये खूप मेहनत नाही ३० मिनिटं करा सायकलिंग

SCROLL FOR NEXT