Video Saam Digital
Video

Video : कुलाबा ते आरे ३३.५ किमीचा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांत; भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार

Mumbai First Underground Metro : मुंबईची भूमिगत मेट्रो ३ च्या लाईनचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे दरम्यानचा ३३.५ किमीचा हा प्रवास ५५ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.

Sandeep Gawade

मुंबईची भूमिगत मेट्रो ३ च्या लाईनचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे दरम्यानचा पहिला टप्पा या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू होईल. एमएमआरसीने यासंदर्भात माहिती दिली. प्रलंबित इलेक्टिक्स आणि प्लंबिंगमुळे फेज १ ला बिलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण मेट्रो लाईन सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती तर फेज १ जूनमध्ये सुरू होणार होता. मात्र प्रलंबित कामांमुळे विलंब झाल्याचं सांगण्यात आलं. ५५ मिनिटांमध्ये कुलाबा ते आरे मेट्रो असा प्रवास करता येणार आहे. एकूण २७ स्थानक या मार्गामध्ये असणार आहेत. ३३.५ किमीचा हा प्रवास असेल. दररोज १७ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज आहे. सकाळी ६.३० वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर रात्री ११ वाजता शेवटी मेट्रो असणार आहे. सीएसएमटी वर चर्चगेट महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला ही मेट्रो जोडली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळाला देखील ही मेट्रो जोडणार आहे. तर मुंबईच्या रस्त्यावरील ६ लाख वाहनं कमी होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT