नागपूर : नागपुरातील खापरखेडा येथील Axis बँकेच्या एटीएममधून प्रत्येक Withdrawal मागे 600 रुपये अतिरिक्त मिळत असल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठीगर्दी केली आहे. ही माहिती शहरात इतरांना कळताच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. ही घटना 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास घडली असून अनेकांनी पाचशे रुपये काढले असता त्यांना सहाशे रुपये अधिक म्हणजे 1100 रुपये मिळत होते. तसेच हजार रुपये काढले असता 1600 रुपये म्हणजे 600 रुपये अधिक अतिरिक्त मिळत होते. दरम्यान एटीएम मध्ये पैशाच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं बोलल जात आहे.
खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळविल्यावर एटीएम दुपारी बंद करत तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत सुमारे 3 लाखा पेक्षा अधिक रुपये अतिरिक्त निघून गेले असल्याच सांगितलं जातं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.