Cold Wave in vidarbha Nagpur saam tv
Video

विदर्भात थंडीचा कहर, २४ तासांत ३ जणांचे मृतदेह आढळले, गारठून मृत्यू झाल्याची शक्यता

Cold Wave in Vidarbha : विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपुरात सर्वाधिक थंडी आहे. मागील २४ तासांत तीन जणांचे मृतदेह आढळले असून, त्यांचा मृत्यू गारठून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nandkumar Joshi

Maharashtra Cold Wave Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर पारा १० अंशांच्या खाली आला आहे. विदर्भात तर थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृत्यू हे थंडीने गारठून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपूरच्या एमआयडीसी, पाचपावली आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू थंडीने गारठल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. ते बेघर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचपावली येथे मेट्रोच्या पिलरखाली, तर एमआयडीसी परिसरात कॅफेसमोर मृतदेह आढळून आले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT