covid news  saam tv
Video

Maharashtra Corona: चिंता वाढली! ठाण्यानंतर पालघरमध्ये कोरोनाने घेतला पहिला बळी, प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन|VIDEO

First COVID-19 Death Reported in Vasai : राज्यात सध्या कोरोणोचा प्रादुर्भाव वाढत असून आता वसई येथील एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. विनीत किणी (वय ४२) असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो वसईच्या खोचिवडे गावातील रहिवासी होता.

गेल्या काही दिवसांत वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे.

मागील दोन दिवसांत ४ हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम आखण्यास सुरुवात केली आहे.

दहा दिवसांपूर्वी वसईत करोनाची लक्षणे असलेला एक रुग्ण आढळला होता. त्याच्यावर वसईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थानिक प्रशासन याबाबत काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT