Hingoli Farmer News Saam Tv
Video

Hingoli Farmer News: हातातोंडाशी आलेला घास हिरावला, हिंगोलीत केळी बागेवर विषप्रयोग; शेतकऱ्याचं लाखो रुपयांचे नुकसान

Hingoli News: हिंगोलीत शेतकऱ्याच्या केळी बागेवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वसमत तालुक्यातील दिग्रस खुर्द गावच्या शिवारात हा विष प्रयोग करण्यात आला आहे. या विषप्रयोगामुळे बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आलेल्या केळी नष्ट झाली आहेत.

Satish Kengar

हिंगोलीत शेतकऱ्याच्या केळी बागेवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वसमत तालुक्यातील दिग्रस खुर्द गावच्या शिवारात हा विष प्रयोग करण्यात आला आहे. या विषप्रयोगामुळे बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आलेल्या केळी नष्ट झाली आहेत. विषप्रयोगामुळे हातातोंडाशी आलेले केळीचे तीन हजार झाडे उध्वस्त झाली आहेत. यामध्ये शेतकरी गणेश मोकळे यांचे 11 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विषप्रयोगाच्या या प्रकारानंतर हिंगोलीसह परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने पोलीस कुरुंदा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा तपास करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तर तातडीने सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे देखील नुकसान झालेले शेतकरी गणेश साहेबराव मोकळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT