Nagpur Saam TV
Video

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

MNS Protest Nagpur : विशाल बोपचे नामक एका तरुणाचा 8 जुलै रोजी अपघातात झाला होता. विशालकडे युनियन बँकेचा एटीएम होतं. त्यानुसार त्याला नुकसान भरपाई म्हणून अपघात विमा मिळतो. परंतू बँक मॅनेजरने एफआयआर कॉपी मराठीत आहे या कारणावरून विमा नाकारला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विशाल बोपचे नामक एका तरुणाचा 8 जुलै रोजी अपघातात झाला होता. मृत विशालकडे युनियन बँकेचे एटीएम कार्ड होते, ज्यामध्ये अपघात विम्याचा लाभ मिळण्याची अट होती. मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांनी जेव्हा नुकसानभरपाईसाठी बँकेकडे धाव घेतली, तेव्हा बँक मॅनेजरने एफआयआर कॉपी मराठीत आहे या कारणावरून विमा नाकारला. त्यामुळे कुटुंबीयांना मोठ्या अन्यायाला सामोरं जावं लागत आहे.

या प्रकाराचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज सेमिनरी हिल्स टीव्ही टॉवरजवळील युनियन बँकेच्या शाखेत पोहोचले असून, संबंधित बँक मॅनेजरला जाब विचारण्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली आहे. एफआयआरमध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा वापर असतो, तरीही फक्त मराठीत असल्याचे कारण देत इन्शुरन्स कंपनी आणि बँकेने भरपाई नाकारल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि बँकिंग व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT