An auto rickshaw intercepted at Subhash Tekdi Chowk in Ulhasnagar after a large amount of cash was allegedly found during election time. Saam Tv
Video

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

₹18–20 Lakh Cash Found In Auto Rickshaw: उल्हासनगरमध्ये निवडणुकीदरम्यान १८ ते २० लाखांची रोकड रिक्षामधून आढळली. अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी पाठलाग करून रिक्षा पकडल्याचा दावा केला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Omkar Sonawane

उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली असून १८ ते २० लाख रुपयांची रोकड एका रिक्षामधून आढळून आली आहे. ही रिक्षा सुभाष टेकडी चौक परिसरात पकडण्यात आली. ही रोकड अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी स्वतः पाठलाग करून पकडल्याचा दावा केला आहे. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित रिक्षाचा पाठलाग केला आणि अखेर सुभाष टेकडी चौकात रिक्षा अडवण्यात आली.

रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. यानंतर रिक्षा चालकासह संपूर्ण रोकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, नरेश गायकवाड यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ही रोकड महानगरपालिका समोर असलेल्या भाजप प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातून निघाल्याचा संशय आहे. मात्र, या आरोपांवर अद्याप भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या घटनेमुळे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोग आणि पोलिस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

SCROLL FOR NEXT