दादर माहीम मतदारसंघाबाबत उध्दव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. दादर माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र विद्यमान आमदार शिंदे गटात गेलेले असल्याने या जागेबाबत आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. दादर माहीमची जागा मनसेला सोडल्यास आगामी महापालिका निवडणुकीला या मतदारसंघातून नामुष्की होऊ शकते, अशी शिवसैनिकांची भूमिका आहे. विधानसभेला उमेदवार उभा करावा दादर माहिमच्या शिवसैनिकांची आग्रही मागणी आहे, मात्र या ठिकाणी उमेदवार द्यायचा असेल तर आपली किती तयारी आहे हे बघण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दादर - माहीमचा आढावा घेतला आहे. दरम्यान, शिवसैनिकांचा म्हणणे ऐकल्यावर उध्दव ठाकरे यांनी 'कळवतो' म्हणून निर्णय अद्यापही राखून ठेवला असल्याचं दिसत आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.