Uddhav Thackeray addressing media after the cash-bag video sparked a political storm in Maharashtra. Saam Tv
Video

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Thackeray Targets Shinde BJP Alliance: नगरपरिषद निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आणि सत्तेचा माज दिसत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. निलेश राणे यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगेच्या व्हिडिओनंतर ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून पैशांनी बॅग भरल्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपन करत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला. या पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तसेच शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत कलह देखील आता समोर आला. यावरच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होत निवडणुकांमधे पैशाचा धूर निघतांना दिसतोय आणि हा सत्तेचा माज महाराष्ट्र पाहतोय, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखाचा हवाला देत त्यांनी राज्यात पैशाचा पाऊस आणि अतिवृष्टी भयानक पद्धतीने सुरू असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीतून सत्तेचा गर्व दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT