Tuljapur drugs case accused joins BJP साम टीव्ही मराठी
Video

Local Body Election : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Tuljapur drugs case accused joins BJP : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Namdeo Kumbhar

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य असताना परमेश्वरने तुळजापूरचे नगराध्यक्षपद भूषवले होते. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्रमध्ये गाजलेले ड्रग्ज प्रकरण आहे. या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चर्चा सुरू आहे. आता ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने पक्षात स्थान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अखंड राष्ट्रवादी असताना संतोष परमेश्वर यांनी तुळजापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं होतं. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वर यांनी साथ दिली होती. त्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याने पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा चर्चेत येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT