Tulja Bhavani Saam TV
Video

Tulja Bhavani : मंदिरात थुकल्यानं तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवर कारवाई | VIDEO

Strict Action at Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या ८ पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंदिर प्रवेशबंदीची कारवाई त्यांच्यावर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळजाभवानी मंदिरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ८ पुजाऱ्यांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचललं आहे. या सर्व पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.मागील महिन्यात मंदिर प्रशासनाने काही पुजाऱ्यांना यासंदर्भात इशारा देत नोटीस बजावली होती. त्यानंतर सहा पुजाऱ्यांनी आपल्या चुकीची कबुली देत माफीनामा सादर केला. या सहा पुजाऱ्यांना एक महिन्याची मंदिर प्रवेशबंदीची शिक्षा देण्यात आली आहे.

मात्र, उर्वरित दोन पुजाऱ्यांनी न खुलासा दिला, ना माफीनामा. त्यामुळे त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करत तब्बल तीन महिन्यांची मंदिर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील पुजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई इशाराच ठरत आहे. तुळजाभवानी मंदिराच्या पवित्र जपण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT