nuclear bomb saam tv
Video

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; म्हणाले अणुबॉम्ब..VIDEO

Iran-Israel Tensions After Trump Comment: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकच्या गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष करत इस्रायलच्या दाव्यांचे समर्थन केले आहे.

Omkar Sonawane

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलं आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने याआधी इराण अण्वस्त्रे विकसित करत नसल्याचा निष्कर्ष दिला होता, मात्र ट्रम्प यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इराणला ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ करण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका-इराण संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. याआधी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी एका अहवालात म्हटलं होतं की, इराण अणुशस्त्रांची निर्मिती करत नाहीये आणि त्याची हालचालही सध्या दिसून येत नाही. मात्र, ट्रम्प यांनी ही माहिती नाकारत इस्रायलच्या इशाऱ्यांना दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suna Yeti Ghara: घर, माणसं आणि नात्याचा खेळ पुन्हा रंगणार; 'सुना येती घरा' छोट्या पडद्यावर लवकरच सुरु होणार नवी मालिका

Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? आत्ताच करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दंड; वाचा काय आहे नियम?

Jalgaon Crime: जळगाव हादरले! २८ महिन्यांत ५० चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, आरोपी नातेवाईकच असल्याचे उघड

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

PM kisan Yojana : शेतकऱ्यांनो या २ चुका टाळाच, अन्यथा ₹२००० होतील बंद; पीएम किसान योजनेवर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT