VIDEO: Nashik शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीची लढत, निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळ पर्यंत थंडावणार Saam TV
Video

VIDEO: Nashik शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीची लढत, निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळ पर्यंत थंडावणार

Nashik MLC Election: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार पाहायला मिळाला होता. तर निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळ पर्यंत थंडावणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: शिक्षक मतदारसंघ निवडणूकीबाबत माहिती समोर येत आहे. शिक्षक मतदार संघाचा प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता थंडावणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे संदीप गुळवे विरुद्ध महायुतीच्या शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर अजित पवार गटाचे महेंद्र भावसार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन तर महाविकास आघाडीकडून संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही शिक्षक मतदारांना खुश करण्यासाठी पैठण्या, सोन्याचे नाणे, नथ, कपडे वाटल्याच्या चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

UPI पेमेंटवरील शुल्कावरून राजकारण तापलं, UPI TAX रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका: जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

SCROLL FOR NEXT