tiktok news Saam Tv
Video

TikTok: टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण|VIDEO

India-China Relations Impact On TikTok Ban: सोशल मीडियावर टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, सध्या तरी टिकटॉकसह इतर चीनी अॅप्सवरील बंदी उठवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

Omkar Sonawane

सोशल मीडियावर टिकटॉक पुन्हा भारतात सुरू होणार असल्याच्या चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. भारत-चीन संबंध सुधारत असल्याने अशा चर्चा रंग घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत जपान आणि चीन या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सुधारत असल्याचं चित्र समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर 2020 मध्ये सुरक्षा कारणांमुळे भारतात बंदी घालण्यात आलेल्या चीनी अॅप्सना परत सुरू करण्याचा विचार होत असल्याची चर्चा आहे. तथापि, केंद्र सरकारने या वृत्ताचं खंडन केलं आहे. सरकारच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या तरी टिकटॉकसह इतर चीनी अॅप्सवरील बंदी हटवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार का, याबाबतची चर्चा सोशल मीडियावर मात्र थंडावण्याचं नाव घेत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT