Thane Pradip Purnekar Death Saam Tv
Video

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Thane Pradip Purnekar Case: ठाण्यात ठाकरेसेनेचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात शिंदेसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या नवऱ्याचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

Priya More

ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. पुर्णेकरांच्या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी ही हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आज पहाटेपर्यंत प्रदीप पुर्णेकर यांचा मृतदेह मुंबईतील जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुर्णेकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पुर्णेकर यांच्या समर्थकांनी घोडबंद रोडवरील मानपाडा या ठिकाणी काही वेळ रस्तारोको देखील केला. त्यामुळे पोलिस आणि समर्थक यांच्यामध्ये काही काळ वाद झाला. टायर पेटवून रस्तारोकोचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी त्यांना बाजूला केलं. रास्तारोको जरी मागे घेतला असला तरी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना देखील अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

Housing Society : सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही म्हणून पाणी बंद केलं? जाणून घ्या फ्लॅट मालकाचा अधिकार, कायदा काय सांगतो?

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT