Thackeray Sena workers gathered outside Mahatma Phule Police Station in Kalyan after a violent clash ahead of municipal elections. Saam Tv
Video

महापालिका निवडणुकीआधीच राडा; ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी, दोघेही रक्तबंबाळ|VIDEO

ShivSena UBT Internal Violence In Kalyan Dombivli: महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेत मोठा राडा झाला आहे. कल्याण डोंबिवलीत उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षा आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यालयामध्ये तोबा गर्दी दिसून येत आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांची मुलाखत सुरू असताना आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली तर ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला. हे दोघे गंभीररित्या जखमी झाले असून दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्ते जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन? काय चर्चा झाली? VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांचं अपहरण आणि सुटका

Maharashtra Politics: इकडे मनसेशी युतीची चर्चा, तिकडे ठाकरेंच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; मराठवाड्यात राजकारण तापलं

फडणवीस-शिंदे-पवारांनी निवडणुकीत १५ हजार कोटी उडवले; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा कोणी केला?

Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT