Thackeray brothers during their joint appearance following the anti-Hindi decision; Gulabrao Patil responds with focus on governance. saam tv
Video

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Gulabrao Patil's reaction to Thackeray unity: हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातील यशाचा जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधु एकत्र आले. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

हिंदी भाषा सक्तीच्या निर्णया विरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. यावरच आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ठाकरे बंधु एकत्र आले, ठीके, चांगली गोष्ट आहे. कोणतेही पक्ष एकत्र होतात, शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे.

त्यात आपण बोलणे उचित नाही, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, आपण त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. आपण फक्त आपल्या पक्षाचे काम करणं, महायुतीच्या सरकारचं काम अजून आणखी गतीने वाढवले पाहिजे. समोरच्याकडे काय अजेंडा आहे? हे आपल्याला माहिती आहे. मराठी आपण पण आहोत, आणि ते देखील मराठी आहेत. फक्त विषय असा आहे की, पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी विषय सक्ती करू नये.

पाचवीपासून सगळे हिंदी बोलतात, मी देखील पाचवीनंतर हिंदी शिकलो आहे. विषय इतकाच आहे की, त्यांनी या विषयाचा बाऊ केला म्हणून आपण करावे, असे आम्हाला वाटत नाही. कोणावर बोलण्यापेक्षा आपल काम जोरात चालल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT