Pahalgam Saam
Video

Kashmir Attack: दहशतवाद्यांचा गोळीबार, पर्यटकांसाठी धावला ‘देवदूत’; बाळाला वाचवणाऱ्या काश्मिरी मुलाचा VIDEO व्हायरल

Terrorist Attack in Pahalgam: पहलगाममधील हल्ल्यानंतर एका पर्यटकाच्या लहान बाळाला एक काश्मिरी मुलगा कडेवर उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांनी जीव गमावला. तर अनेक जण जखमी झाले. पर्यटकांना वाचवण्यासाठी एका स्थानिक घोडेवाल्यानं जीवाची बाजी लावली. दहशतवाद्यांशी तो एकटा भिडला. त्यांच्या हातून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण निर्दयी दहशतवाद्यांनी त्याचाही जीव घेतला. दहशतवादी गोळीबार करताना अनेक स्थानिक तरुणांनी धाडस दाखवून पर्यटकांना वाचवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका पर्यटकाला पाठीवर उचलून सुरक्षितस्थळी घेऊन जातानाचा एका स्थानिक तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तसाच आणखी एका काश्मिरी मुलाच्या धाडसाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. पर्यटकाच्या लहान बाळाला एक काश्मिरी मुलगा कडेवर उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. स्थानिक मुलानं दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दहशतवादी गोळीबार करत असताना काश्मिरी मुलानं पर्यटकाच्या हातातलं बाळ आपल्या जवळ घेतलं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेत जीव वाचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT