सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले, तब्बल एक तास दोघांमध्ये चर्चा सुरू होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होत असताना, भेटीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले नाही.
दरम्यान 'माझ्या भावाच्या निधना बाबतीत राजू शेट्टी यांना कल्पना नव्हती,ते माझ्या भेटीला येणार होते. त्यामुळे ही सांत्वनपर ही भेट असून त्यात राजकीय काहीही कारण नाही' असं मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. सोबतच त्यांनी महायुतीबद्दल सुरू असणाऱ्या चर्चांवर देखील भाष्य केले आहे.
दरम्यान 'महायुती आणि महाविकास आघाडी हे शेवटपर्यंत एकसंध राहतील असे मला वाटत नाही. आगामी काळात आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार आहेत असा दावा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.