Ajit Pawar News: खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असून बि-बियाणे आणि रासायनिक खताची खरेदीची लगबग सध्या सुरू आहे. मात्र जालना जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीचे बियाणे चढ्यादराने विक्री होत असल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी राज्यातून अनेक ठिकाणांहून येत आहेत. दरम्यान कृषी सेवा केंद्र चालकांनी चढ्यादराने बियाणे, खते विक्री करू नये अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून कृषीसेवा केंद्राकडून बोगस बियाणे विक्री झाल्यास कठोर कारवाई करू असा इशारा देखील कृषी विभागाने दिलेला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच संदर्भात सूचना केल्यात. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा असे निर्देश अजित पवारांनी दिलेत!
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.