Latur News Update SaamTv
Video

Latur News : लातूरमध्ये मध्यरात्री ड्रोनच्या गूढ हालचाली; व्हिडिओ आला समोर

Saam Tv

लातूरच्या ग्रामीण भागात मध्यरात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे किल्लारी, रेणापूर, डिगोळ तांडा भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून रेकी केली जात असल्याचा संशय ग्रामस्थाना आहे.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून मध्यरात्री उशिरा ड्रोन आकाशात फिरत असल्याचं आढळून आलं आहे. किल्लारी, रेणापूर, डिगोळ तांडा या परिसरात हा ड्रोन कॅमेरा दिसून आला आहे. हा ड्रोन कोणाचा? अचानक अशा घिरट्या का मारत आहे? त्यातून नेमके काय बघितले जात आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थाना पडलेले आहेत. याबद्दल भितीचे वातावरण तयार झाल्याने ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना देखील दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून आता हा ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. ड्रोन कॅमेरा उडवणारा इसम जोवर सापडत नाही तोवर हा नेमका काय प्रकार आहे ते सांगता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT