VIDEO: भारताच्या T20 World Cup 2024 मधील विजयामध्ये सुर्यकुमार यादवचा मोलाचा वाटा  Saam TV
Video

VIDEO: भारताच्या T20 World Cup 2024 मधील विजयामध्ये सुर्यकुमार यादवचा मोलाचा वाटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये T20 WCचा फायनल सामना खेळला गेला, यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. ही मॅच आणि ट्रॉफी भारताच्या हातातून निसटणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण सुर्यकुमार यादवच्या एका कॅचने टीम इंडियाचा अख्खा डावच पलटला आणि साऊथ आफ्रिकेच्या पराभवाला गळती लागली. सूर्याने असं काय केलं? शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातला सामना अविस्मरणीय आहे. टीम इंडियानं आफ्रिकेला १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पेलण्यासाठी आफ्रिकेच्या प्रत्येक प्लेअरनं आपली बाजी पणाला लावली होती. ट्रीशन स्टब्स आणि क्विंटन डी कॉकने केलेली खेळी आफ्रिकेला विजयाच्या दिशेनं घेऊन जात होती. शेवटच्या क्षणी साऊथ आफ्रिका विजयाच्या अगदी जवळ होता. एक ओव्हरमध्ये आफ्रिकेला १६ धावांची गरज होती.

मैदानात डेव्हिड मिलर आणि हार्दिक पांड्या आमनेसामने होते. दोघांच्याही डोळ्यात विजयाची ट्रॉफी दिसत होती. हार्दिकनं पहिला बॉल टाकला. तो यॉर्कर टाकायला गेला पण चुकून फुलटॉस गेला. यावेळी डेव्हिड मिलरनं त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि लॉंग शॉट मारला. त्याला वाटलं आता सिक्स कन्फर्म. पण त्याचक्षणी सीमेवर उभ्या असलेल्या सूर्याने पळत जाऊन कॅच पकडला. जी बिल्कुल शक्य नव्हती. सूर्याची ही फक्त कॅच नव्हती तर ही ICC World Cupची ट्रॉफी होती. सूर्याने कॅच पकडल्यानंतर आफ्रिकेचं टेन्शन वाढलं. पॅव्हेलियनमध्ये परतताना मिलरच्या तोंडांवर बारा वाजले होते. कारण सूर्याने आफ्रिकेच्या विजयाचे दोर कापून टाकले होते.

सूर्या पुन्हा एकदा तळपला आणि टीम इंडियाच्या विजयाचे दरवाजे ऑटोमॅटीक ओपन झाले. ट्रॉफी हातातून सुटणार हे जवळपास निश्चित झालेल्या भारतीयांच्या डोळ्यात आता आनंदाअश्रू दाटून आले कारण स्टेडीयममध्ये खामोश बसलेल्या प्रत्येक भारतीयानं एकच जल्लोष साजरा केला आणि भारताचा आवाज संपूर्ण जगभरात घुमला कारण सूर्या यशाची गुरूकिल्ली ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata Punch CAMO : टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नवीन अवतारात! किंमत फक्त 8.45 लाख रुपये, कोणकोणते आहेत फिचर्स?

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

SCROLL FOR NEXT