अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हा विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर आता अजित पवारांचं टेन्शन वाढलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हं वापरू देऊ नका, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजितदादांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे नैराश्यातून ही याचिका करण्यात आल्याची टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकांचं बीगुल लवकरच वाजणार आहे. अशातच आता अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढतांना दिसत आहेत. पक्ष फुटीच्या राजकारणानंतर मिळालेलं घड्याळ चिन्ह त्यांना वापरू देऊ नये यासंदर्भात याचिका शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात दखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हं वापरू देऊ नका, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शरद पवार यांना मिळालेल्या नवीन चिन्हाप्रमाणे त्यांनाही नवीन चिन्ह द्यावे, असं याचिकेत म्हंटल आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.