Supriya Sule addressing media while alleging misuse of money and helicopters in local body elections. Saam Tv
Video

निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या, निवडणुका रद्द करण्याची मागणी|VIDEO

Supriya Sule Demand To Cancel Maharashtra Local Body Elections: स्थानिक निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा गैरवापर होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Omkar Sonawane

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पैशांचा अवाढव्य वापर आणि हेलिकॉप्टरचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. लोकसभा, विधानसभेला हेलिकॉप्टर पाहिले, पण स्थानिक निवडणुकीत हे पहिल्यांदाच पाहतेय, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मतांसाठी पैशांचा गैरवापर आणि मतदारांना आमिष दाखवले जात असल्याचा दावा करत, सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. हा मुद्दा आपण संसदेतही मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीसाठी ही बाब घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT