Supreme Court of India rebukes Enforcement Directorate in a politically sensitive case linked to Karnataka's ruling leaders.  Saam Tv
Video

Supreme Court on ED: आम्हाला बोलायला भाग पाडू नका, कोर्टाने ईडीला सुनावले खडेबोल | VIDEO

SC to ED: सुप्रीम कोर्टाने ईडीला खडेबोल सुनावत म्हटलं, राजकीय संघर्षात मतदार निर्णय घेतील, तुमचा वापर होऊ देऊ नका. कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने ईडीचे अपील फेटाळले आणि कठोर शब्दांत तंबी दिली.

Omkar Sonawane

सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीमध्ये सक्त वसूली संचालनालयाला (ईडी) खडेबोल सुनावले आहे. राजकीय संघर्षात राजकीय पक्ष आणि मतदार बघून घेतील. तुमचा वापर होऊ देऊ नका, असे ईडीला सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामाय्या यांच्या पत्नी पार्वती आणि राज्यमंत्री बिरथी सुरेश यांच्याविरुद्ध म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) द्वारे जागा वाटपाच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. यावर ईडीची देखील कारवाई सुरू होती. मात्र ईडीने दाखल केलेल आरोप रद्द करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले होते. या उच्च न्यायालयालच्या निकालाविरोधात ईडीने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले होते. मात्र हे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले की, दुर्दैवाने महाराष्ट्रात ईडीबाबत मला काही असेच अनुभव आले आहे. आता आम्हाला अधिक बोलायची वेळ आणू नका, नाहीतर ईडीबाबत कठोर भाष्य करू असा इशारा सरन्यायाधीशांनी दिला,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT