Sujay Vikhe saam tv
Video

Vaishnavi Hagwane: मी एका लग्नाला गेलो नवरदेव आला पण नवरीच पळून गेली; सुजय सुजय विखेंकडून अजितदादांची पाठराखण|VIDEO

Sujay Vikhe on political targeting in Hagawane case: भाजप नेते तथा दक्षिण आहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणावर प्रतिक्रिया देत त्यांनी गेलेल्या एकालग्नाचा अनुभव सांगितला आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणेच्या लग्नात अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीने त्यांच्यावर अनेकजण टीकास्त्र सोडत आहे. यावरच भाजप नेते तथा नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांची पाठराखण केली आहे. आम्ही देखील लग्नात जातो भेटी देतो.. त्यातील अनेक संसाराबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली होती मग काय करणार.. त्यामुळे अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे. हगवणे कुटुंबाला या पूर्वी कोणी ओळखत नव्हतं.

मात्र आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे. त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. त्यामुळे राजकीय लोकांना अशा प्रकरणात ओढू नये. आमच्या बरोबर देखील अनेक जण फोटो काढतात. त्यानंतर काहीजण म्हणतात हा वाळू तस्कर आहे. हा आरोपी होता. हे टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल. प्रत्येक आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावण्याची वेळ येईल केवळ लग्नाला गेल्यामुळे अजित दादांना टार्गेट करणं चुकीचं आहे.

उबाठा गट आणि शरद पवार गटाच्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाहीत. ज्या लोकांना पत्रिका येत नाही त्या लोकांना कोणी दुसरा लग्नात गेला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उबाठा आणि शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना देखील लग्नाच्या पत्रिका द्यायला सुरुवात करा असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लागवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT