BJP leader Sudhir Mungantiwar addressing the media on Agriculture Minister Manikrao Kokate’s controversial rummy game video from the Maharashtra Assembly. Saam Tv
Video

विधानसभेत रम्मी खेळल्याप्रकरणी कोकाटेंवर मुनगंटीवारांचा हल्लाबोल, VIDEO

Sudhir Mungantiwar Demands Suspension Of Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत चौकशीसाठी नैतिक समितीकडे प्रकरण सोपवण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एखादा जनप्रतिनिधी हा लोकशाहीला घातक वर्तणूक करत असेल, तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा नियम संसंदेत आहे. अशाच प्रकारची एक नैतिक समिती राज्यातही आहे. या समितीने प्रकरणाची योग्य चौकशी करून विधानसभेचे पावित्र्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांचे एकेक कारनामे विरोधक समोर् आणत आहे, यामुळे राज्यातील जनतेमध्ये नाराजीचा सुर उमटला असून लोक आता संताप व्यक्त करत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रति वादग्रस्त विधान केले होते यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. राज्यात दररोज आठ शेतकरी हे आत्महत्या करताय मात्र कृषिमंत्री हे विधानभवनातच पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहे. यावरू आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हल्लाबोल चढवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Famous Actress : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केले आलिशान घर, पाहा PHOTOS

Crime News : मुळशी पॅटर्न; दारवलीतील घटनेने खळबळ, गायींच्या गोठ्यात आढळला युवकाचा मृतदेह

Piyush Pandey Passed Away: 'अबकी बार मोदी सरकार', 'मिले सुर मेरा तुम्हारा' टॅगलाईनचे जनक पियुष पांडे याचं निधन

Shashank Ketkar : शशांक केतकरच्या मुलांना पाहिलं का? भाऊबीजेला पहिल्यांदाच PHOTOS केले शेअर

SCROLL FOR NEXT