मध्य रेल्वेवर लोकलऐवजी बैलगाडी धावली तर तुम्ही म्हणाल हे काय आहे? पण हे आम्ही नाही तर मध्य रेल्वेने म्हटलंय. एका प्रवाशानं लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना लोकलऐवजी बैलगाडी सुरू करा, असं लिहिलं होतं. यावर तक्रार आवश्यक कार्यवाहीसाठी वर्ग केलं असल्याचं उत्तर रेल्वे प्रशासनाला दिलं आहे. सध्या हे चॅट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सातत्याने ट्विटर या समाजमाध्यमावर प्रवाशी तक्रारी नोंदवून मध्य रेल्वेच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, खात्यांना त्यात टॅग करीत असतात. त्या तक्रारींना संबंधित अधिकारी प्रतिसादही देत असतात. मध्य रेल्वेच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या अशाच एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या कारभाराची तक्रार मंगळवारी नोंदवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.