ST Bus SaamTv
Video

ST Buses : प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री! एसटीचा प्रवास महागणार | Marathi News

ST Bus Fare Increased : नव्या वर्षापासून एसटीचा प्रवास महागणार असल्याचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

Saam Tv

एसटीच्या दरात आता 14 टक्क्यांची भाडेवाढ होणार आहे. नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. तसे संकेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले आहेत.

एसटीच्या 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार आहे. तर सध्या बसचा प्रवास 80 रुपयांनी महागणार आहे. सध्या एसटीकडे सुमारे १४ हजार बस आहेत. ज्यात २४० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस आहेत, तर ४९० वातानुकूलित शिवशाही बसेस आहेत. उर्वरित साध्या बसेस आहेत. यातून दिवसाला हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सध्या महामंडळाला दिवसाला 3 ते साडेतीन कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भाडेवाढ नव्या वर्षापासून लागू केली जाणार आहे. याबद्दलचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT