electric wire falls on wedding mandap in washim saam tv
Video

Washim Accident : लग्न मंडपावर सोलर खांब कोसळला; 6 जखमी, 2 गंभीर, VIDEO

solar pole falls on wedding mandap washim : वाशिममधील मानोरा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळं ग्रामपंचायतीचा सोलर खांब वीज वाहिन्यांवर कोसळला. त्या वीज वाहिन्या लग्न मंडपावर पडल्या. यात सहा जण जखमी झाले आहेत.

Nandkumar Joshi

मनोज जयस्वाल, वाशिम | साम टीव्ही

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव येथे वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब वीज वाहिन्यांवर कोसळून अपघात झाला. सोलर खांब कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून थेट लग्न मंडपावर पडल्या. त्यामुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. तर विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले. सोलर खांब अंगावर पडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं लग्नघरी काही काळ भीतीचं वातावरण होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत FDA आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Wednesday Horoscope: 7 राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

Sleeping Without Underwear: रात्रीच्या वेळेस अंतर्वस्त्र घालून झोपणं योग्य की अयोग्य?

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT