Maharashtra ZP Election Voting x
Video

Solapur ZP Election : सोलापुरात चक्क ढाब्यावर ईव्हीएम मशीन, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

EVM controversy news India latest : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ढाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी नेत्याने गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली असून प्रशासनाने ही मशीन राखीव असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Namdeo Kumbhar

EVM Found In Solapur Hotel Dhaba : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात एका ढाब्यावर चक्क ईव्हीएम मशीन आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून निवडणूक प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Maharashtra ZP election news today)

दरम्यान, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले की, 'या मशीन राखीव (Reserve) असून कोणताही गैरप्रकार झालेला नाही'. प्रशासनाने या मशीन केवळ राखीव साठा म्हणून ठेवल्याचा दावा केला असला तरी, खाजगी ठिकाणी मशीन आढळल्याने संशयाचे वातावरण कायम आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. निवडणूक प्रक्रियेतील ही त्रुटी आहे की घातपात, याबाबत आता चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT