Doctor performing endoscopy to safely remove a swallowed magnet from a six-year-old child. AI
Video

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Six Year Old Swallows Magnet At Home: चंद्रपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलाने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळला. डॉ. राहुल सैनानी यांनी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीने ते काढून मुलाला वाचवले.

Omkar Sonawane

संजय तुमराम, साम टीव्ही

चंद्रपूर: लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षांच्या एका चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले. चंद्रपुरातील गॅस्टोएन्टेरॉलॉजी पोट, लिव्हर, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या साह्याने अत्यंत शिताफीने हे लोहचुंबक बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिले आहे. चंद्रपुरातील सहा वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता. त्यावेळी त्याचे आई-वडील जवळ नव्हते. खेळता खेळता त्याने ते लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले.

मुलगा रडत काही पोटात गेल्याचे पालकांना सांगितले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे हलविण्यात आले. विशेष म्हणजे, मुलाने घटनेच्या काही वेळाआधीच जेवण केले होते. अशा परिस्थितीत भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. मुलाची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी वेळ न घालवता 'एंडोस्कोपी' करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही चिरफाड न करता आणि भूल न देता, केवळ २ मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने ते लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात आले. यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य शस्त्रक्रिया टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT